भाऊ आरोग्य कार्ड - एक स्वास्थ्य आधार!

भाऊ आरोग्य कार्ड

भाऊ आरोग्य कार्ड

image
image

सर्व बंधू आणि भगिनींना आमचा नमस्कार,

             आपण सर्वांना ठाऊकच आहे की मागील १ वर्षापासुन आपल्या सार्वजनिक आरोग्यास कोरोना महामारिने घट्ट विळखा घातलेला आहे तरी आपण "माझे कुटुंब, माझी जबाबदारी" या उपक्रमअंतर्गत स्वतः जबाबदार बनून यशस्वीपणे झुंज देत आहोत. म्हणूनच या बिकट परिस्थितीत मुख्यतः ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य तसेच जीवनमान उंचावण्याचा ध्येय डोळ्यासमोर ठेऊन आपले प्रिय पालकमंत्री तथा पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री, महाराष्ट्र राज्य भाऊसो. ना. गुलाबरावजी पाटील यांच्या सूचनेनुसार व मा. श्री. प्रतापराव पाटील, जिल्हा परिषद सदस्य यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण भागातील तमाम जनतेसाठी मोफत "भाऊ आरोग्य कार्ड" या नावाने अद्वितीय असे उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. हा उपक्रम ग्रामीण भागातील समस्थ जनतेसाठी खुले असून विशेष प्राधान्याने सामाजिक उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आलेला आहे.

             भाऊ आरोग्य कार्डच्या नावाप्रमाणेच ग्रामीण भागातील कुटुंबांना निरोगी जीवन जगण्यासाठी वात्सल्य आणि मदतीचा एक स्वास्थ्य आधार उपलब्ध करून देणे हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न कारण आदरणीय गुलाबभाऊंच्या मते जगात बदल घडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्नही खूप मोठा असतो.
भाऊ आरोग्य कार्डाची संकल्पना व प्रमुख उद्दिष्टे -

  • खाजगी रुग्णालयामध्ये होणाऱ्या खर्चाचा आर्थिक भार काही प्रमाणात कमी व्हावा म्हणून रुग्णालयाच्या बिलात १० ते १०० टक्यांपर्यंत आर्थिक सूट मिळवून देणे.
  • विषशज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सोयी सुविधा सहजरित्या उपलब्ध करून लाभ मिळवून देणे.
  • आपल्या घरीच राहून ऑनलाईन डिजिटल पद्धतीने भाऊ आरोग्य कार्डाची नोंदणी करता येते.
  • सहकार्य, सेवा आणि विकास या तत्वावर आधारित प्रत्येक घराघरात निरोगी आरोग्य व संकटसमयी आधार उपलब्ध करून देणे.भाऊ आरोग्य कार्ड नोंदणी प्रक्रिया –

             भाऊ आरोग्य कार्डचे लाभ घेण्यासाठी आपणास प्रथमतः आपल्या संकेस्थळावरील "संपर्क" वर क्लिक करून उपलब्ध असलेल्या कार्यालयीन पत्त्यावर अथवा ऑनलाईन नमुना फॉर्म भरून आपल्या कुटुंबातील सदस्यांची योग्य माहिती देवुन नोंदणी करणे आवश्यक आहे. अर्ज करतेवेळी कुटुंबातील सदस्यांचा आधार कार्ड, मतदान कार्ड, रेशन कार्ड ई. कागतपत्रे जोडणे अनिवार्य आहे. नोंदणीकृत परिवारातील कुटुंब प्रमुखास विहित नमुन्यात कार्डचे वितरण करण्यात येईल.
भाऊ आरोग्य कार्डचा उपयोग व लाभ –

             प्रत्येक कार्ड धारकास विविध आरोग्यसेवेचा लाभ घेण्यासाठी विकल्प म्हणून प्रत्येक विद्याशाखेचे विशेषज्ञ डॉक्टरांची संपूर्ण माहिती (डॉक्टरांचे नाव, दुरध्वनी क्रमांक, शैक्षणिक पात्रता, उपचार विशेषज्ञता व उपलब्ध सोयी सुविधा, श्रेणीनुसार आर्थिक सूट, तपासणी फी, तसेच रुग्णालयाचा पत्ता) ही या संकेतस्थळावर "विशेषज्ञ डॉक्टर्स" येथे क्लिक करून उपलब्ध आहे. या उपलब्ध माहिती नुसार डॉक्टर व रुग्णालय निवडण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य हे कार्ड धारकांचे असेल.

             भाऊ आरोग्य कार्ड वापराचा अधिकार हा संबंधित कार्ड धारक व त्यांच्या कुटुंबातील रेशनकार्ड वरील सदस्यांसाठीच गृहीत धरलेला असून रुग्णाने स्वतःची ओळख असलेले कागदपत्रे (आधार कार्ड, मतदार कार्ड, वाहन परवाना, ई. फोटो आयडी) व सदर कार्ड रुग्णालयात आल्यानंतर उपचारापूर्वीच दाखविणे बंधनकारक असेल. तसेच सदर कार्डाची लाभ मिळवण्याची मुदत ही प्रथमतः ३ वर्ष असेल.

             भाऊ आरोग्य कार्ड या उपक्रमांतर्गत खाजगी रुग्णालयामध्ये फक्त सवलती च्या दरात उपचार आहेत, मोफत उपचार नाही. वेगवेगळ्या आजारानुसार व रुग्णाच्या आपत्कालीन स्थितीनुसार दिलेल्या आर्थिक सूट मध्ये बदल संभवतात यासंदर्भात सर्व अधिकार हे रुग्णालय प्रशासनाने कडे राखीव आहेत. अशा अपवादात्मक परिस्थितीत कार्ड धारकांनी उपचाराआधी योग्य ती चर्चा करून माहिती जाणून घ्यावी. औषधींचा या आर्थिक सूट मध्ये समावेश नाही तसेच आरोग्य विमा धारक अथवा शासकीय / अशासकीय योजनेचे लाभ घेणाऱ्या कार्ड धारकांना या उपक्रमांतर्गत अतिरिक्त सवलत मिळणार नाही याची आपण नोंद घ्यावी.

             राष्ट्र धर्म सर्वोपरी मानून या कठीण काळात लोकसेवा करण्याचा हा एक छोटासा प्रामाणिक व कृतिशील प्रयत्न... अर्थात आपल्या सहकार्य व सहभागाशिवाय हा यज्ञ पूर्ण होणे नाहीच. म्हणूनच आपल्या सहकार्याची व सहभागाची अपेक्षा असेल, धन्यवाद..!
आपले विनम्र,

सीए. हितेश किशोर आगीवाल
प्रकल्प प्रमुख
  75886 48980
 hitesh@gpfcares.org

श्री. मुकुंद गोसावी
प्रकल्प समन्वयक
  98504 08374